Pune City News
कोरोनाराष्ट्रीय

कोरोना : देशात एका दिवसात 88 नवे रुग्ण

Pune City News :- केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या भारतात 16 वर पोहोचली आहे.
एका दिवसात देशभरात 80 नवीन लोकांनी संक्रमण झाल्याची धक्कादयक माहिती समोर येत आहे. आतापर्यंत देशभरात 694 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
महाराष्ट्रात सर्वात जास्त कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. गुरुवारी आणखी 5 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले असून आता ही संख्या 130 वर पोहोचली आहे.

दिवसेंदिवस वाढत जाणारे आकडे भीती आणि चिंता निर्माण करणारे आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार भारत अजूनही दुसऱ्या टप्प्यात आहे.
कोरोना व्हायरसचा होणारा परिणाम लक्षात घेता देशभरात लॉकडाऊन करण्यात आला असून लोकांनाही घराबाहेर न पडण्याचं आवाहन वारंवार केलं जात आहे. कोरोनाचा प्रसार थांबला नाही तर लॉकडाउन वाढवला जावू शकतो अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

Related posts

कोरोना : घोरपडीगाव मधील ३० जण रुग्णालयात !

Vishal Khandagale

क्रेडाई पुणे मेट्रोकडून महापालिकेच्या दळवी रुग्णालयात अद्ययावत अतिदक्षता विभाग !

Vishal Khandagale

“मला राज्यसभेची अपेक्षाच नव्हती” एकनाथ खडसे

Vishal Khandagale

Leave a Comment