Pune City News
कोरोनाराष्ट्रीय

कोरोना : तीन महिने ईएमआय ची स्थगिती चा सल्ला!

Pune City News:- करोना विषाणू च्या पार्श्वभूमीवर रेपो दरात कपात करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे. रेपो दरात 0.75 टक्क्यांची कपात केल्याची घोषणा रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी केली. तसंच नागरिकांनी संयम बाळगावा, असंही त्यांनी नमूद केलं. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे सर्व प्रकारची कर्ज स्वस्त होणार आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेकडून मोठा निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. त्यानुसार रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांता दास यांनी पत्रकार परिषदेत मोठी घोषणा केली.
शुक्रवारी रिझर्व्ह बँकेने रेपो दरात 0.75 टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे रेपो दर 5.15 टक्क्यांवरून 4.4 टक्क्यांवर आला आहे. तर रिव्हर्स रेपो दरात 0.90 टक्क्यांची कपात केली आहे. यामुळे रिव्हर्स रेपो दर 4.90 टक्क्यांवरून 4 टक्क्यांवर आला आहे. याव्यतिरिक्त अल्पकालावधीच्या कर्जाच्या व्याजदरात कपात करण्याची घोषणाही शक्तिकाता दास यांनी केली. याव्यतिरिक्त रिवर्स रेपो दरातही 0.90 टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेनं घेतला आहे. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे सर्व प्रकारच्या कर्जाच्या हप्त्याची रक्कम कमी होणार आहे
तसेच … कर्जाच्या हप्त्यांची वसूली तीन महिन्यांसाठी स्थगित करण्याचा सल्लाही बँकांना शक्तिकांता दास यांनी दिला आहे. असं झाल्यास सामान्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

Related posts

पुण्यात रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा

Vishal Khandagale

आधार अपडेट करणे झाले खर्चिक

Vishal Khandagale

पुणे शहरातील सर्व उद्यान बंद

Vishal Khandagale

Leave a Comment