Pune City News
पुणे

पुणे शहरात CRPF दाखल…

Pune City News:- पुणे महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना चा वाढता प्रादुर्भाव आहे.सद्यपरिस्थितीत पुणे शहरातील अनेक कटेनमेंट झोन प्रशासनाने घोषित केले आहेत. या कटेनमेंट झोन च्या नागरिकांना बाहेर पडण्यास मज्जाव असतानाही अनेक नागरिक रस्त्यावर उतरत आहेत. यामुळे आता रॅपिड अँक्शन फोर्सच्या तुकडीला तैनात करण्यात आले असून आज त्यांनी शहरातील सहकारनगर, धनकवडी, बालाजीनगर परिसरातून रुटमार्च काढला. शहरात ज्या भागात कोरोना रुग्णांची संख्या अधिक आहे अशा कटेनमेंट झोन मध्ये नागरिकांनी घराबाहेर पडू नये म्हणुन आज फ़्लैग मार्च काढण्यात आला.

पुणे शहर पोलिसांच्या मदतीला आता सीआरपीएफचे जवान आल्याने नागरिकांना शिस्त पाळावीच लागणार आहे. दरम्यान, रमजान सणाच्या पार्श्वभुमीवर शहर पोलिसांच्या मदतीला सीआरपीएफची तुकडी आलेली असल्याने आता शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यास प्रशासनाला मदत होणार आहे.

Related posts

पुण्यातील तीन मित्रांनी दिला 1100 विद्यार्थ्यांना आधार !

Vishal Khandagale

“कोरोना” बाबत अफवा पसरवणारी शिक्षिका निलंबित!!

Vishal Khandagale

थकबाकी असलेल्या मिळकतकर धारकांसाठी २ ऑक्टोबरपासून ‘अभय’ योजना

Vishal Khandagale

Leave a Comment