पुणेमहाराष्ट्र

बारामती येथे पोलिस व वकिलांची न्यायालया मध्ये तुफान धुमश्चक्री !

Pune City News:- पुणे जिल्हा न्यायालय बारामती येथे पोलिस आणि वकिलांची तुफान धुमश्चक्री झाली. पोलीस उपाधीक्षक नारायण शिरगावकर सह इतर पोलिसांना जोरदार मारहाण झाली.त्यानंतर पोलिसांनी ही केला लाठीचार्ज.

बारामतीत काल संध्याकाळी एका वकिलासह नाना सातव आणि अन्य कार्यकर्त्यांवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाला होता. त्याच्या न्यायालयीन कामासाठी त्यांना कोर्टात हजर केले तेव्हा. एक पोलीस कर्मचारी व्हिडिओ शूटिंग करत होता. त्याला वकिलांनी अटकाव केला.कोर्टाच्या आवारात बेकायदा शूटिंग करू नका असे सांगितले यावर पोलीस कर्मचाऱ्याने अरेरावीची भाषा केली.

त्यानंतर उपविभगायीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर तेथे हजर झाले. त्यानंतर वकील राजेंद्र काळे, नितीन भामे व इतर वकिलांची शिरगावकर यांच्या सोबत शिवीगाळ झाली. झालेल्या बाचाबाची नंतर त्याचे रूपांतर हाणामारी मध्ये झाले आणि दोन्ही बाजूने तुफान मारामारी झाली.पोलिसांनी काही वकिलांना ताब्यात घेतले असून अद्याप त्यांच्यावर काय कारवाई झाली हे समजले नाही. मात्र या प्रकारानंतर वकील संघटना प्रचंड आक्रमक झाल्या असून पोलीस कायद्याचा गैरवापर करत असल्याचा आरोप केला आहे.

दरम्यान पोलीस उपाधीक्षक यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे वकील संघटना यांचेकडून बोलले जात आहे.

Related posts

३५ दिवसांचा संघर्ष करत नवजात बाळाची कोरोनावर मात

Vishal Khandagale

सार्वजनिक ठिकाणी वावरतांना नागरिकांनी मास्कचा वापर करावा- विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर

Vishal Khandagale

मजुरांनी गावाकडे जाण्याचा प्रयत्न करु नये : गृहमंत्री अनिल देशमुख

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX