Pune City News
कोरोनापुणे

भाजपा च्या नगरसेविकेने उभारले मजुरांसाठी अन्नछत्र !

Pune City News:- कोरोनाचे संकट जगासमोर उभे राहिल्याने राज्यात लाॅकडाऊन करण्यात आले. हाताला काम नाही,मनात कोरोनाची भिती. यामुळे शहरातील मजुरांनी आपल्या गावाची वाट धरली आहे. लहान चिमूरड्यां पासून ते वयोवृध्द नागरीक गावाकडे निघाले आहे. खिशात पैसा नाही. वाटेत जेवणाची आणि पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने.

तान्हलेले आणि भुकेलेले स्थितीच चालत चालत निघाले आहेत. या मजुरांसाठी नगररोड वरील विमाननगर चौकात अन्नछत्र भारतीय जनता पार्टी,प्रभाग क्र.३ (ब)च्या नगरसेविका सौ.श्वेताताई महेश गलांडे-खोसे
यानी सुरू केले आहे.लहान मुलांना ऊन आणि पावसापासून संरक्षण करण्यासाठी छत्रीही वाटप करण्यात आले.

या उपक्रमांसाठी विशेष सहकार्या ललित गलांडे व सुधीर ढमढेरे केले
हा उपक्रमा यशस्वी करण्यासाठी शिवसाई प्रतिष्ठान व कर्तव्य फाऊंडैशन सभासद संपत पाबळकर,नयन बोरा,आनंद क्षीरसागर,प्रमोद देवकर,संतोष गायकवाड,अभिजीत कुलकर्णी,शिरीष राऊत,व इतर सहकार्य केले.

*

Related posts

अर्बन गोस्वामी विरोधात खडक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

Vishal Khandagale

हर्षवर्धन जाधव यांची येरवडा कारागृहात रवानगी

Vishal Khandagale

बारामती येथे पोलिस व वकिलांची न्यायालया मध्ये तुफान धुमश्चक्री !

Vishal Khandagale

Leave a Comment