आरोग्यकसबाकोथरूडकोरोनाखडकवासलापर्वतीपुणे कॅंटोन्मेंटपुणे शहरवडगावशेरीशिवाजीनगरहडपसर

शहरातील कोरोनाबाधितांची आजची आकडेवारी धक्कादायक !

पुणे शहर प्रतिनिधी :- शहरातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढत असल्याचं चित्र आहे.आजची कोरोना रुग्णांची आकडेवारी धक्कादायक आहे.

आज दिवसभरात ३  हजार २८६  पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात १ हजार २००  रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. आज कोरोनामुळे २३  जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे.

सध्या ५९९  क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरात  एकूण बाधित  रूग्णसंख्या २,४७,६२९ इतकी आहे. तर पुण्यात २८५७८  ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आत्तापर्यंत एकूण ५१३७  जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. आजपर्यंत २,१३,९१४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज १६५७८  जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून शहरात कोरोना बाधित संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर शहरात  कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे पण तरीही कोरोना रूग्णांची संख्या आटोक्यात येत नसल्याचं पाहायला मिळत आहे.

Related posts

सेंट मॅथ्यूज मराठी चर्च च्या वतीने तृतीयपंथी नागरिकांना मदतीचा हात!

Vishal Khandagale

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अज्ञात शाखेचा एतिहासिक कागदपत्रांमधून उलगडा

Vishal Khandagale

वंचित बहुजन सामाजिक संघाच्या वतीने टाळेबंद काळात देखील “रक्तदान शिबिर” यशस्वी !

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX