Pune City News:- पुणे शहरात कोरोना चा वाढता प्रादुर्भाव मुळे तसेच अवकाळी पाऊसा मुळे हवामानात झालेला बदल त्यामुळे सर्दी ,खोकला येत असल्याने नागरिकांन मधे कोरोना विषयी भिती चे वातावरण निर्माण झाले होते. याच पश्वभुमीवर आज दिनांक 16 मे रोजी “भारतीय जैन संघटना” यांच्या सहकार्याने डॉक्टर आपल्या दारी हा उपक्रम वैफील्ड वसाहत येथे राबविण्यात आला. यासाठी माजी नगरसेविका सागरताई रोकडे व वडगांवशेरी विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अभिजीत रोकडे यांच्या प्रयत्नातून सुमारे 1220 नागरिकांची आरोग्य तपासणी व वसाहती मधील सर्व नागरिकांचे थर्मल स्क्रीनींग करण्यात आले व त्यांना जाणवत असलेल्या आजारांवर मोफत औषधोपचार देण्यात आले.



यावेळी विशाल खंडागळे,शेवराव यादव,किशोर डोळस,सलीम मुल्ला,प्रतिक जाधव,प्रवीण साबळे,कुणाल शिंदे,आदि उपस्थित होते.

