Pune City News
पिपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्र

मंत्रालयात सामान्यांना प्रवेश बंद!

कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत मंत्रालयात सामान्यांना नागरिकांना प्रवेश बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. कामाच्या निमित्ताने राज्यभरातील लोकं मंत्रालयात येत असतात. त्यामुळे होणारी गर्दी लक्षात घेता,हा मोठा निर्णय घेतला आहे.
मंत्रालयात येणाऱ्या सर्वसामान्य व्यक्तींना 31 मार्चपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे मंत्री, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाच आता मंत्रालयात जाता येणार आहे.
राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 37वर गेली आहे.
पुणे 16, मुंबई 8, ठाणे 1, कल्याण 1, नवी मुंबई 2,
पनवेल 1, नागपूर 4, अहमदनगर 1 , यवतमाळ 2,औरंगाबाद 1
अशी रुग्णांची संख्या आहे.

Related posts

व्हाइट हाऊसमध्ये कोरोनाचा रुग्ण!

Vishal Khandagale

केंद्रीय मंत्रालयाचे परिपत्रक पुण्याला लागू नाही !

Vishal Khandagale

सिद्धार्थ नगर येथे उभारण्यात येत असलेल्या गृह निर्माण प्रकल्पात पुढील दोन वर्षात पक्की घरे देण्यात येतील – मुख्य कार्यकारी अधिकारी सतीशकुमार खडके

Vishal Khandagale

Leave a Comment