PUNE CITY NEWS :- देशभरात कोरोनाने अक्षरश: धुमाकूळ घातला असून दिवसभरात कोरोनाचे 5000 हून अधिक रुग्ण आढळून येत आहे. गेल्या 24 तासांता देशात 5242 कोरोना रुग्ण आढळले असून ही आतापर्यंतची सर्वाधिक वाढ झालेली रुग्णसंख्या आहे. यामुळे देशात कोरोना रुग्णांची एकूण संख्या 96,169 वर पोहोचली आहे.गेल्या 24 तासांत 157 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांची एकूण संख्या 3029 इतकी झाली आहे अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. देशात सध्याच्या स्थितीत 56 हजार 316 रुग्णांवर उपचार सुरु असून 36 हजार 824 रुग्ण बरे झाल्याची माहिती देखील आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. भारतात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात असून राज्यात एकूण 33,053 रुग्ण आढळले आहेत. त्यापाठोपाठ गुजरातमध्ये 11,379 एकूण रुग्ण आहेत.
previous post

