Pune City News:- पुणे विभागात कोरोना संसर्गजन्य रोगामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा तसेच कायदा व सुव्यवस्थेचा पुणे, सातारा, सांगली, सोलापूर व कोल्हापूर या जिल्हयांचा जिल्हानिहाय आढावा विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेतला.
यावेळी पुणे महानगरपालिका आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, उपायुक्त संजयसिंह चव्हाण, प्रताप जाधव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय देशमुख आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ. म्हैसेकर म्हणाले, पर राज्यातून व पर जिल्हयातून येणाऱ्या नागरिकांची तपासणी करुन घेवून त्यांच्या अलगीकरणाबाबत सर्वांनी विशेष दक्षता घ्यावी. जिल्हयात शहरी व ग्रामीण भागातील संशयित, बाधित रुग्ण, मृत्यू झालेले रुग्ण याबाबतचा अहवाल वेळोवेळी पाठवत राहण्याच्या सूचना डॉ. म्हैसेकर यांनी केल्या.

