Pune City News
पिपरी चिंचवडपुणे

२१०० कर्मचाऱ्यांना पगारच नाही

Pune City News:- पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या रोजंदारीवरील २१०० कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्याचा पगारच मिळालेला नाही.पीएमपी व्यवस्थापनाने कामगार आयुक्तांनी याबाबत मार्गदर्शन करण्याची मागणी केली आहे. मात्र, वेतन न मिळाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे.

याबाबत व्यवस्थापनाकडून लॉकडाऊनच्या काळात या २१०० कामगारांना (चालक, वाहक आणि अन्य बदली कामगार) काम न दिल्याने या कर्मचाऱ्यांना वेतनही दिलेले नाही.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील वाहतूक सेवा बंद ठेवावी लागली. त्याचा आर्थिक फटका पीएमपीएमएलला बसला आहे. तसेच रोजंदारीवर असलेल्या कर्मचाऱ्यांनाही बसला.

रोजंदारीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचे वेतन देण्यात आले. मात्र, एप्रिल महिन्याचे देण्यात आले नाही. याबाबत मार्गदर्शन करावे, असा प्रस्ताव कामगार आयुक्त कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे.

Related posts

पुण्यात कोरोनाचा पहिला बळी

Vishal Khandagale

मंगळवार पेठ “Micro Containment Zone” पहा !

Vishal Khandagale

सकाळी आठ ते रात्री 10 वाजेपर्यंतच हॉटेल, रेस्टॉरंट, बार राहणार सुरू,नवे नियम…

Vishal Khandagale

Leave a Comment