Pune City News
पिपरी चिंचवड

पिंपरीत भीषण अपघात !

Pune City News:- पिंपरीमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात रविवारी (दि.२४) दुपारी तीनचाकी टेम्पो आणि कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला.

याबाबत अधिक माहिती अशी की, जुना पुणे-मुंबई महामार्गावर पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात रविवारी दुपारी एक तीनचाकी टेम्पो आणि कारचा भीषण अपघात झाला आहे.

या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर जखमींना पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.अपघातामध्ये टेम्पो बीआरटी मार्गाच्या दुभाजकावर गेला असून कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या कठड्यावर आदळली आहे. दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

Related posts

‘चला हवा येऊ द्या’ च्या डोक्यात घुसली हवा

Vishal Khandagale

कोरोना; राज्य सरकारने घेतले मोठे निर्णय

Vishal Khandagale

पिंपरीत दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा खून; सहा अल्पवयीन आरोपींना अटक

Vishal Khandagale

Leave a Comment