राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (शुक्रवारी) पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटला भेट दिली. या भेटी दरम्यान पवार यांनी एक लस घेतली. मात्र, सर्वांना वाटले की, पवार यांनी कोरोनावरील लस घेतली. त्यामुळे काही वेळ चर्चेला चांगलेच उधाण आले होते.
मात्र, या चर्चांना शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टोक्ती दिली. यावेळी शरद पवार म्हणाले की, मी कोरोनावरील लस घेतली अशी लोकांमध्ये चर्चा आहे.
मात्र तसे काही झालेले नाही. मी सिरमकडे आता रोगप्रतिकारशक्ती वाढवणारी (आरबीसीजी ट्रिपल बुस्टर)नावाची लस आहे. तसेच माझ्या स्टाफनेही ही लस घेतल्याचे पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
आज मी सिर्ममध्ये कोरोना लसीवरील कामाची माहिती घेण्यासाठी आलो असल्याचे सांगितले. त्यामुळे शरद पवार यांनी कोरोनाची लस घेतलेल्या चर्चेला त्यांनी पूर्णविराम दिला.

