पिपरी चिंचवडपुणे

खाजगी रुग्णालयांनी नियमानुसार दर आकारावे

कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करताना खाजगी रुग्णालयांनी शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार दर आकारणी करावी, अशा सूचना करुन खाजगी रुग्णालय व्यवस्थापनाने प्रशासनाला सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले.

राज्य शासनाने कोरोना उपचारासाठी घेतलेल्या निर्णयाच्या अनुशंगाने विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर व जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज कॉन्सिल हॉलमध्ये पुणे व पिंपरी चिंचवडमधील खाजगी रुग्णालय प्रमुख व वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली.

बैठकीला आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय देशमुख, उपायुक्त संजयसिंह चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, पुणे महानगरपालिकेचे आरोग्य विभाग प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे, भारती हॉस्पिटलच्या व्यवस्थापकीय संचालक डॉ. अस्मिता जगताप यांच्यासह पुणे व पिंपरी चिंचवड मधील खाजगी रुग्णालय प्रमुख, वैद्यकीय अधिकारी, व डॉक्टर उपस्थित होते.

Related posts

सोशल डिस्टन्सिंग’साठी अजित पवार आग्रही

Vishal Khandagale

प्रजासत्ताकदिनी कारागृहात सुरू होणार ‘पर्यटन’

Vishal Khandagale

कृषी कायद्याविरोधात शरद पवार मैदानात उतरणार

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.