पुणेमहाराष्ट्र

सोशल डिस्टन्सिंग’साठी अजित पवार आग्रही

PUNE CITY NEWS :- राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने कोरोना होऊ नये म्हणून राजकारण्यांनी जनतेला काळजी घेण्याचे आवाहन करतानाच स्वत:चीही काळजी घेण्यास सुरुवात केली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार तर स्वत:ची सर्वाधिक काळजी घेताना दिसत आहेत. तोंडाला मास्क आणि हातात ग्लोव्हज घालूनच ते घराबाहेर पडतात.

त्यांनी पत्रकारांना बाईट देताना चक्क मीडियाचा बुमच सॅनिटाइज केला. त्यांच्या या कृतीतून त्यांनी जसे कोरोनापासून सावध राहण्याचा संदेशच दिला आहे.

कोविड सेंटरच्या उद्घाटन सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार आले होते. कार्यक्रमानंतर पवार यांनी मीडियाशी संवाद साधला.

तत्पूर्वी त्यांनी खिशातली सॅनिटायझरची बाटली काढली आणि मीडियाच्या बुमवर सॅनिटायझर फवारले. त्यानंतर तोंडाला मास्क लावूनच त्यांनी मीडियाशी संवाद साधला.

Related posts

३ ऑगस्टला विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Vishal Khandagale

कोरोना; महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या 122 वर

Vishal Khandagale

संगमवाडी-टिंगरेनगर विस्तारित रस्त्याचे भूमिपूजन रामदास आठवले यांच्या हस्ते !

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX