Pune City News
पिपरी चिंचवडपुणे

मृत्युदर कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत

कोविड-१९ विरुद्धच्या युद्धात डॉक्टर, परीचारिकांची भूमिका महत्वपूर्ण आहे. त्यामुळे मृत्यूदर कमी करण्यासाठी डॉक्टरांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले.

खाजगी रुग्णालयांनी प्रशासनाशी समन्वय ठेवून एकत्रित काम करावे व पुणे जिल्हा कोरोनामुक्त करुया, असेही त्यांनी सांगितले.कोरोना संसर्गाचा मुकाबला करण्यासाठी सरकारी आणि खाजगी रुग्णालये मिळून काम करणे आवश्यक आहे.

राम पुढे म्हणाले, डॉक्टरांनी कोरोना रुग्णांवर उपचार करताना काही बदल करणे आवश्यक असल्याचे कळविल्यास प्रशासन निश्चितच सकारात्मक असेल.

रुग्णालयांनी बेड व्यवस्थापन व्यवस्थित हाताळावे, जेणे करून अडचण निर्माण न होता प्रत्येक गरजू रुग्णाला तातडीने उपचार देणे सुलभ होईल.

यावेळी पुण्यातील खाजगी रुग्णालय व्यवस्थापनाचे प्रमुख, डॉक्टर तसेच कोरोना प्रतिबंधासाठी कार्यरत अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत खाजगी रुग्णालय प्रमुख व वैद्यकीय अधिकारी यांनी सूचना केल्या व रुग्णालयातील सेवा-सुविधा व साधनसामग्रीची माहिती देण्यात आली.

Related posts

फरासखाना पोलीसांकडून बंगाली सोने कारागिरांना अन्नधान्याचे वाटप !

Vishal Khandagale

पिंपरी चिंचवडमधील हा परिसर सील

Vishal Khandagale

चिंचवडमध्ये चार दुकाने फोडली….

Vishal Khandagale

Leave a Comment