Pune City News
पुणे

कोरोनाला रोखण्यासाठी नगरसेवक, आमदार, खासदार होणार ‘चौकीदार’ : गिरीश बापट

पुणे शहरातील कोरोनाचे संकट आटोक्यात आणण्यासाठी भाजपचे 100 नगरसेवक, 8 आमदार व खासदार आजपासून चौकीदार म्हणून काम करणार असल्याची माहिती खासदार गिरीश बापट यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
पुणे शहर भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, खासदार गिरीशभाऊ बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे, भीमराव तपकिर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते धीरज घाटे, शहर सरचिटणीस राजेश येनपुरे, राजेश पांडे यांनी मनपा आयुक्त कार्यालयात कोरोना नियंत्रित करण्यासाठी नियुक्त केलेल्या चार आयएएस अधिकाऱ्यांशी मंगळवारी चर्चा केली.
यावेळी बापट म्हणाले, कोरोना नियंत्रण करीत ४ आयएएस अधिकाऱ्यांना शहरातील वेगवेगळे भाग वाटून देण्यात आले आहेत. मात्र त्यांच्यामध्ये सुसूत्रीकरण होणे जरुरी आहे. आमचे असंख्य कार्यकर्ते काम करायला तयार आहेत. लाखो लोकांना जेवण, अन्नधान्य, भाजीपाला, दूध वाटप करण्याचे काम त्यांनी केले आहे.

Related posts

वारजेत ४५ मीटर उंचीच्या राष्ट्रध्वज स्तंभाचे शरद पवारसाहेबांच्या हस्ते अनावरण

Vishal Khandagale

हाथरस प्रकरणी प्रियंका गांधींचे मोदी सरकारला “पाच प्रश्न”

Vishal Khandagale

पुणे शहरातील सर्व उद्यान बंद

Vishal Khandagale

Leave a Comment