पुणे शहरातील नगररोड वरील फिनिक्स मॉल दुपारी 3 वाजता च्या दरम्यान चौथा ४ मजल्यावरील Cuba Libre या पब मध्ये प्रथम दर्शनी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती. आगीच्या ज्वाळांनी व धुरा मुळे मॉल मधील नागरिकांन मध्ये भीती पसरली होती. मॉल चे सुरक्षारक्षक मॉल प्रशासन व विमाननगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक खोबरे साहेब यांच्या तत्पर निर्णायक भूमिका बजावत मॉल मधील सर्व नागरिकांना व कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.
अग्नीशामक दलाच्या गाड्या येण्या पूर्वीच मॉल प्रशासन वतीने आगीवर नियंत्रण मिळविले होते. या मध्ये मॉल च्या मालमत्ते चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले व कोणतीही जिवीतहानी झाली नाही.

आजच्या या घटने मुळे पुणे महापालिका हद्दीतील मॉल ची सुरक्षा तापसण्याची पुन्हा गरज आहे.
#phoneix #Punemall #phoenix #PhoenixMallofAsia #punefire #mallfire

