कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील नागरीकांसाठी दररोज नवे नियम बनवले जात आहेत. पुण्यातील बाजारपेठा आणि दुकाने हळू हळू पूर्वपदावर येत आहे. मात्र असे असताना काही गावे अद्यापही पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहेत. शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव ग्रामीण भागात जाऊ नये, यासाठी हवेली तालुक्यातील शहरालगतच्या चार गावांमधील सरकारी, खासगी अधिकारी, कर्मचाऱ्यांसह नागरिकांना पुणे-पिंपरी चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रात प्रवेश बंदी घालण्यात आली आहे.
आज शनिवारपासून (दि.६ ) ते शुक्रवारपर्यंत (दि.१२) पर्यंत आदेश हवेलीचे उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर यांनी जारी केले आहेत.
शासकीय यंत्रणेची हवेली तालुक्यातील मांजरी बुद्रुक, कदमवाकवस्ती, नऱ्हे आणि वाघोली येथील रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी बैठक झाली. सर्वानुमते आढळलेल्या गावांमधील नागरिकांच्या हालचालीवर पुणे व पिंपरी चिंचवडच्या हद्दीतील शासकीय कार्यालये, खासगी कंपनी अथवा करणाऱ्यावर काही बंधने घालणे आवश्यक असल्याचे म्हणणे या बैठकीमध्ये मांडले.

