महाराष्ट्रराष्ट्रीय

राष्ट्रीय क्रमवारीत डी. वाय.पाटील दंत महाविद्यालयाला तिसरे स्थान…

PUNE CITY NEWS :- केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालय यांच्या वतीने गुरुवारी( दि.११) रोजी भारतीय शैक्षणिक संस्था तसेच विद्यापीठ यांचे एनआईआरएफ रैंकिंग २०२० नुसार मूल्यमापन करण्यात आले. केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री डॉ. रमेश पोखरीयाल यांनी घोषणा केली.

देशपातळीवर पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ अंतर्गत डॉ. डी. वाय पाटील दंत महाविद्यालयास ३ रे स्थान प्राप्त झाले आहे. ‘दंत महाविद्यालय श्रेणीत’ देशात तिसरे व महाराष्ट्रात प्रथम ठरले.पहिल्यांदाच दंत शाखेचा एन आई आर एफ श्रेणी मध्ये सामावेश करण्यात आला होता.

‘वैद्यकीय श्रेणीत” डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयास २४ वे स्थान प्राप्त झाले. डॉ. डी. वाय. पाटील युनिटेक सोसायटी अंतर्गत डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फर्मास्युटिकल्स सायन्स अँड रिसर्च महाविद्यालयाला ४१ वे स्थान प्राप्त झाले तर डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेकनॉलॉजी महाविद्यालयास १९६ वे स्थान प्राप्त झाले आहे.

भारतातील एकूण ५००० हुन अधिक शैक्षणिक संस्थांचे एनआईआरएफमार्फत मूल्यमापन करण्यात आले होते.
“दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यावर आमचा अधिक भर आहे. प्राध्यापक व विद्यार्थी यांनी शिक्षणाप्रती घेतलेल्या या परिश्रमामुळे आज हे यश प्राप्त झाले. याचा आम्हाला अभिमान वाटतो.

विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक व आधुनिक युगात सक्षम करणे हाच हेतू आहे”. असे मत डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील व्यक्त केले.

Related posts

अष्टविनायक-श्रीक्षेत्र ओझर येथील विघ्नहर मंदिरात चोरी..

Vishal Khandagale

देशाच्या संसदेत मिळणार ‘ही’ संधी!

Vishal Khandagale

14 एप्रिल नंतर लॉकडाऊन पूर्णपणे उठवणार नाही चे संकेत…

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX