PUNE CITY NEWS :कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढला आहे. भारतासाठी पुढील 30 दिवस महत्त्वाचे आहे. या सर्व पार्श्वभूमीवर देशातील प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी जगजागृती केली जात आहे. त्याला काहीअंशी यश आल्याचे दिसते आहे.
कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर आज रात्री आठ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाशी संवाद साधणार आहे. हा संवाद महत्त्वाचा ठरणार आहे.
मुंबईतील दुकाने एक दिवसाआड उघडणार
नागपूरमध्ये पुढील 3 दिवस सलून बंद राहणार
राज्यातील शाळा-कॉलेज, मॉल्स, पब, महत्त्वाची पर्यटन आणि धार्मिक स्थळे 31 मार्चपर्यंत बंद
देशातील बाधितांची संख्या – 151
देशातील मृतांची संख्या – 3 (कर्नाटक – 1, दिल्ली – 1, महाराष्ट्र – 1)
जिल्हानिहाय आढावा :
● पिंपरी-चिंचवड – 11
● पुणे – 8
● मुंबई – 8
● नवी मुंबई – 3
● ठाणे – 1
● रायगड – 1
● कल्याण – 3
● नागपूर – 4
● यवतमाळ – 3
● अहमदनगर – 1
● औरंगाबाद – 1
● उल्हासनगर – 1
● रत्नागिरी – 1

