PUNE CITY NEWS :- जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले असून रशियाकडून अधिकृतरीत्या एका औषधाची घोषणा करण्यात आली आहे.
देशातील विविध भागांत हे औषध उपलब्ध करून देण्यात येत असून रशियाकडून कोरोनावरील उपचारासाठी एविफेविर या अॅण्टी व्हायरल औषधाच्या वापराला सुरुवात झाली आहे.
देशातील जवळपास सर्व भागात या औषधाचा पुरवठा करण्यासंबंधी करार करण्यात आला असून या औषधाविषयी रशियामधील RDFI या मंडळाने सदरील माहिती दिली आहे.
तसेच एविफेविर औषधाचा वापर करणारे काही रुग्ण 4 दिवसांमध्ये बरे झाल्याचा दावाही या मंडळाकडून करण्यात आला आहे.
दरम्यान, रशियात या अॅण्टी व्हायरल औषधाचा वापर सुरू झाल्यानंतर जगभरातील तब्बल दहा देशांनी रशियाकडे या औषधाची मागणी केली आहे.

