Pune City News
महाराष्ट्रराष्ट्रीय

आयआयटी मुंबई देशात अव्वल मात्र जगात…

PUNE CITY NEWS :- शैक्षणिक, संशोधन, पायाभूत सुविधा आदींच्या आधारे जगभरातील शैक्षणिक संस्थांची गुणवत्ता क्यूएस वर्ल्ड रँकिंग 2021 जाहीर झाली आहे. जगातील पहिल्या 500 संस्थांमध्ये भारतातील फक्त आठ संस्थांना स्थान मिळाले आहे. एवढेच नव्हे तर भारताची सर्वाधिक प्रतिष्ठित आणि प्रसिद्ध आयआयटी मुंबई जागतिक क्रमवारीत घसरली आहे. मात्र देशात संस्था अग्रस्थानी आहे.

तुलना : क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2021 मध्ये आयआयटी मुंबईचे स्थान 2020 च्या तुलनेत 20 अंकांनी खाली घसरले आहे. 2021 च्या यादीत आयआयटी जागतिक स्तरावर 172 व्या क्रमांकावर आली आहे. 2020 मध्ये 152 व्या स्थानावर होती.

गुण व स्थान : देशाच्या यादीत आयआयटी मुंबई अग्रस्थानी असून आयआयटी मुंबईला 100 पैकी 46 गुण मिळाले आहेत. शैक्षणिक विभागात संस्थेला 50.4, तर प्राध्यापकांचा शैक्षणिक दर्जा या विभागात 74.2 गुण मिळाले आहेत. भारतीय विज्ञान संस्थान, बेंगळुरूने यंदाच्या क्यूएस वर्ल्ड रँकिंगमध्ये 185 वे स्थान मिळवले आहे. तर, आयआयटी दिल्ली 193 व्या स्थानावर आहे.

आयआयटी मुंबईचे संचालक प्रा. सुभाशिष चौधरी म्हणाले : आयआयटी मुंबईने देशातील अव्वल संस्था राहण्याचा मान कायम ठेवला आहे. याचबरोबर आम्ही जागतिक स्तरावरही चांगल्या प्रकारे कामगिरी करत आहोत. जागतिक क्रमवारीत आम्ही खाली आहोत, मात्र ते संस्थेच्या शैक्षणिक दर्जाशी संबंधित आहे. यावर अधिक काम करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

Related posts

‘येस बँक’ निर्बंधमुक्त होणार!

Vishal Khandagale

३ ऑगस्टला विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Vishal Khandagale

मध्यरात्रीपासून देशभरात 21 दिवस लॉकडाऊन

Vishal Khandagale

Leave a Comment