राष्ट्रीय

चीनची भारताला धमकी!

भारत आणि चीनदरम्यान सीमेवरीव तणाव कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तर दुसरीकडे चीन आपल्या सरकारी वृत्तपत्रातून भारतविरोधी गरळ ओकताना दिसत आहे. दरम्यान, भारताने आपल्या धोरणांचे पालन करावे आणि अमेरिकेपासून दूर राहावे, असं चीनचे मुखपत्र असणाऱ्या ग्लोबल टाईम्सने म्हटले आहे.

“चीनचा विरोध करण्यासाठी भारताने अमेरिकेला साथ दिल्यास चीन आपल्या हितांचे रक्षण करण्यास मागेपुढे पाहणार नाही, मग ते राजकीय असेल किंवा आर्थिक,” असेही ग्लोबल टाईम्समध्ये म्हटले आहे.

“भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये परस्पर सहमतीनंतर सीमेवरील तणाव कमी करण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत,” असे ग्लोबल टाईम्सने चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हुआ चुनयिंग यांच्या हवाल्याने म्हटले आहे.

“दोन्ही देशांच्या सीमेवर तणाव कमी झाल्यानं दोन्ही देशांमध्ये भविष्यात आर्थिक आणि व्यापाराचे आदान प्रदान करण्याची संधी मिळेल. हे दोन्ही देशांच्या हिताचे ठरणार आहे. जर राजकारणाचा अर्थव्यवस्था आणि व्यवहारावरील परिणाम पाहिला असता तर द्विपक्षीय व्यापारावर नक्कीच प्रभाव जाणवला असता कारण भारतातही चीनविरोधी भावना वेगाने वाढत आहेत,” अशी मुखपत्राच्या संपादकीयमध्ये नमूद केले आहे.

Related posts

शिवसेनेने संसद भवनाच्या आवारात साजरी केली शिवजयंती !

Vishal Khandagale

देशात भरात 1.90 लाखापेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण

Vishal Khandagale

कोरोनामुक्तीसाठी केंद्राचा व्यापक अँक्शन प्लॅन !

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX