Pune City News
राष्ट्रीय

देशात भरात 1.90 लाखापेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण

देशात  ( दि.१६  जानेवारी ) पासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली आहे.

त्या पार्श्वभूमीवर देशात आज दिवसभरात १ लाख ९१  हजार १८१  जणांना कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस देण्यात आले.

देशातील ११  राज्यांमध्ये ‘सीरम’ची ‘कोव्हिशिल्ड’ आणि भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ या लसीचे डोस देण्यात आले.

आसाम, बिहार, हरयाणा, कर्नाटक, ओडिशा, राजस्थान, महाराष्ट्र, तामिळनाडू, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि दिल्ली या राज्यांमध्ये नागरिकांना कोरोना लसीचे डोस देण्यात आले.

लसीकरणानंतर कुठल्याही व्यक्तीला रुग्णालयात दाखल करावे लागल्याचे अद्यापपर्यंत समोर आलेले नाही, असे आरोग्य मंत्रालयाने सांगितले.

केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवरुन सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांच्या आरोग्य मंत्र्यांचे यशस्वी लसीकरणाबद्दल कौतुक केले आहे.

Related posts

कर्मचाऱ्यांना घरी बसून काम करण्याचा पर्याय

Vishal Khandagale

मध्य प्रदेशातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात !

Vishal Khandagale

मोदी सरकारचा निर्णय! ‘इतक्या’ लाखापर्यंतच्या उत्पन्नावर GST मधून सूट

Vishal Khandagale

Leave a Comment