Pune City News
राष्ट्रीय

इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत वाढली..

INCOME TAX

इन्कम टॅक्स रिटर्न (आयटीआर) भरण्याची मुदत एक महिन्याने वाढवल्याची घोषणा केंद्र शासनाने केली. करदात्यांना यामुळे दिलासा मिळाला आहे.

त्यामुळे आर्थिक वर्ष 2018-19 साठी आयटीआर भरण्याची मुदत 31 जुलै 2020 पर्यंत असणार आहे. केंद्राकडून यापूर्वीच आर्थिक वर्ष 2019-20 साठी आयटीआर भरण्याची तारीख 30 नोव्हेंबर 2020 पर्यंत वाढवली आहे.

केंद्राने आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्याची मुदतही एक वर्षासाठी अर्थात 31 मार्च 2021 पर्यंत वाढवली आहे.

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) अधिसूचनेद्वारे विविध गुंतवणूकी आणि आय-टी कायद्यांतर्गत कपात करण्याचा दावा करण्याची मर्यादादेखील एक महिन्यासाठी 31 जुलै 2020 पर्यंत वाढविली आहे.

नव्या अंतिम मुदती… :

आर्थिक वर्ष 2018-19 (मूल्यांकन वर्ष 2019-20) साठी मूळ तसेच सुधारित आयकर विवरणपत्र भरण्याची मुदत 31 जुलै, 2020 पर्यंत वाढविली आहे.

आर्थिक वर्ष 2019-20 (मूल्यांकन वर्ष 2020-21) साठी प्राप्तिकर परताव्याची मुदत 30 नोव्हेंबर 2020 पर्यंत वाढविली आहे. त्यामुळे 31 जुलै 2020 आणि 31 ऑक्टोबर 202 पर्यंत भरलेल्या उत्पन्नाचा परतावा 30 नोव्हेंबर 2020 पर्यंत भरता येईल. यामुळे टॅक्स ऑडिट अहवाल देण्याची मुदतही 31ऑक्टोबर 2020 पर्यंत वाढविली आहे.

लहान आणि मध्यमवर्गीय करदात्यांसाठी, 1 लाखापर्यंतचा सेल्फ असेसमेंट टॅक्स भरण्याची मुदत 30 नोव्हेंबर 2020 पर्यंत वाढविली आहे. सेल्फ असेसमेंट टॅक्सची रक्कम 1 लाखापेक्षा जास्त असलेल्या करदात्यांना मुदतवाढ दिली जाणार नसल्याचेही आयकर विभागाने स्पष्ट
केले आहे.

आयकर कायद्यानुसार कलम 80 सी नुसार (एलआयसी, पीपीएफ, एनएससी इ.), 80 डी (मेडिक्लेम), 80 जी (देणगी) यांच्या वजावटीसाठी दावा करण्यासाठी विविध गुंतवणूक / पेमेंट करण्याची मुदत 31 जुलैपर्यंत वाढवली आहे.

कर भरण्याच्या विलंब शुल्कावर कमी केलेले 9 टक्के व्याज दर 30 जून 2020 नंतर केलेल्या भरण्यावर लागू होणार नाही.

Related posts

पुणे शहरातील सर्व उद्यान बंद

Vishal Khandagale

आयपीएल क्रिकेट स्पर्धा 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलली

Vishal Khandagale

कोरोना; प्लॅटफॉर्म तिकिटात तब्बल पाच पटीने वाढ

Vishal Khandagale

Leave a Comment