PUNE CITY NEWS :- वडगाव शेरी विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली आहे.
आमदार टिंगरे यांनी कोरोनाची चाचणी केली. ती चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने ते दवाखान्यात उपचार घेत आहे.
माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनीही आपली कोरोनाची चाचणी करून घ्यावी असे आवाहन टिंगरे यांनी ट्विटरद्वारे केली आहे.
नागरिकांना मदतीसाठी नेहमी ते सतर्क असायचे. नेमके कुणाच्या संपर्कात आल्याने त्यांना लागण झाल्याचे अद्याप समजू शकले नाही.
On noticing initial symptoms, I have tested positive for #COVID19. My symptoms are mild, but I have been hospitalized as a precaution. I request all those who have come in contact with me in the last few days to be extra vigilant of symptoms and self-isolate as a precaution.
— Sunil Tingre (@suniltingre) September 2, 2020

