कोरोनाला तोंड देण्यासाठी मार्च महिन्यात स्थापन केलेल्या पीएम केअर्स निधीला स्थापनेपासून फक्त पाच दिवसांमध्ये ३०७६.६२ कोटी रुपये मिळाल्याचे या निधीने बुधवारी सार्वजनिक केलेल्या खाते विवरणावरून दिसत आहे.
देणगी : ‘रिसिप्ट अॅण्ड पेमेंट अकाऊंट’ नुसार, ३०७५.८५ कोटी रुपयांची रक्कम ‘ऐच्छिक देणगी’ म्हणून दाखविली असून, ३९.६७ कोटी रुपये विदेशातील देणगी म्हणून मिळाली आहे.
क्लोजिंग बॅलन्स : व्याजाची रक्कम जोडून व विदेशी विनिमयावर सेवा कर कापून घेतल्यानंतर ३१ मार्च २०२० रोजीचा ‘क्लोजिंग बॅलन्स’ ३०७६.६२ कोटी रुपये दाखवला आहे.
या निधीच्या संकेतस्थळावर हा निधी २.२५ लाखांच्या प्रारंभिक कोषासह सुरू झाला होता.
‘प्राइम मिनिस्टर्स सिटिझन असिस्टंस अॅण्ड रिलीफ इमर्जन्सी सिच्युएशन्स फंड हा निधी पूर्णपणे व्यक्ती व संस्था यांच्याकडून मिळालेल्या ऐच्छिक देणग्यांच्या स्वरूपात आहे.

