Pune City News
राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ट्विटर अकाऊंट हॅक

पंतप्रधानन नरेंद्र मोदी यांचे ट्विटर अकाऊंट हॅकर्सने हॅक केले आहे. हे अकाऊंट त्यांचे खासगी अकाऊंट नसून त्यांच्या वेबसाईटशी जोडलेले आहे.

हॅकरनं नरेंद्र मोदी यांच्या नावे असलेलं ट्विटर अकाऊंट हॅक केलं आणि पीएम केअर फंडासाठी डोनेशन म्हणून हॅकरनं चक्क बिटक्वाइन देण्याची मागणी केली. हॅकरनं हे ट्विट नंतर लगेच डिलीट केले.

हॅकर्सनी मोदींच्या ट्विटर अकाऊंटवर लिहलं की, ‘कोविड -19 साठी पंतप्रधान मोदी रिलीफ फंडामध्ये आपण दान करावे असं मी आपणास अपील करतो’. या अकाऊंटला तब्बल 2.5 दशलक्ष फॉलोअर्स आहेत.

बिटकॉइन काय आहे? : बिटकॉइन हे एक व्हर्च्युअल चलन आहे. हे डॉलर, रूपये किंवा पौंड सारख्या अन्य चलनांमध्ये देखील वापरलं जाऊ शकतं.

ऑनलाइन देयकाव्यतिरिक्त, डॉलर आणि इतर एजन्सीमध्येसुद्धा ते बदललं जाऊ शकतात. हे चलन 2009 मध्ये बिटकॉइनच्या रूपात वापरात आलं होतं. आज याचा वापर जागतिक पेमेंटसाठीही केला जात आहे.

Related posts

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची आत्महत्या

Vishal Khandagale

5 एप्रिल रोजी मला फक्त 9 मिनिटं द्या : पंतप्रधान

Vishal Khandagale

या देशात लाँच झाली व्हॉट्सअ‍ॅपची पेमेंट सेवा

Vishal Khandagale

Leave a Comment