गुगल आपला प्ले स्टोर सुरक्षित प्लॅटफॉर्म बनविण्यासाठी वारंवार बनावट अॅप्सला हटवत आहे. गुगलने बनावट अॅप्सला शोधण्यासाठी अनेक सुरक्षा कंपन्यांसोबत भागीदारी केली आहे.
अॅप्स शोधले : व्हाइट ऑप्स सटोरी थ्रेट इंटेलिजेंस अँड रिसर्च टीमने 65 हजार फोनवर टेराकोट्टा जाहिरात दाखवण्याच्या प्रकरणात 5 हजार बनावट अॅप्स शोधले आहे.
इंस्टॉल करण्यासाठी हे अॅप्स ग्राहकांना मोफत स्बस्क्रिप्शन, वस्तूंवर डिस्काउंट, कॉन्सर्ट तिकिट आणि अन्य मोफत गिफ्ट देण्याची ऑफर देतात, जे बेकायदेशीर आहे. याशिवाय हे अॅप्स युजर्सची फसवणूक करतात.
युजर्स या बनावट अॅप्सला इंस्टॉल केल्यानंतर सर्वात प्रथम एपीके कोडमध्ये बदल करतात. या कारणामुळे अॅप्स स्मार्टफोनच्या सिक्युरिटीपासून वाचतात.

