पुणे

अपंग बांधवाना व घरटं प्रकल्पातील अनाथ मुलांना सुका शिधा वाटप !

अपंग बांधवाना व घरटं प्रकल्पातील अनाथ मुलांना रुपेश मोरे मित्र परिवारा तर्फे सुका शिधा वाटप करण्यात आले . हडपसरमधील बंटर शाळेमधील घरटं प्रकल्पातील अनाथ मुलांना व अपंग बांधवाना हा सुका शिधा देण्यात आला .

या कार्यक्रमाचे आयोजन अक्षय कोठावळे , रितेश मोरे व राजाभाऊ वासुंडे यांनी केले होते . कोरोनाच्या महामारीमध्ये सर्व लोकांची परिस्थिती गंभीर आहे . रुपेश मोरे यांनी आपल्या लग्नाचा खर्च कमी करून अपंग बांधवाना व अनाथ मुलांना सुका शिधा वाटप केले .

कोरोना महामारीमध्ये गरजू , अपंग , अनाथ , वृध्द , हातावरचे पोट असणारे यांना आपल्या कुवतीप्रमाणे मदत करा व त्यांचे मनोबल वाढवा , असे आवाहन अक्षय कोठावळे यांनी केले .

Related posts

कुठल्याही प्रकारे बेडची कमतरता भासणार नाही -उपमुख्यमंत्री अजित पवार

Vishal Khandagale

विमाननगर मधील चौकाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात यावे- फिरोज शेख

Vishal Khandagale

पुण्यातील हॉटेल्स तीन दिवस बंद!

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX