Pune City News
Uncategorizedपुणे

विमाननगर मधील चौकाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात यावे- फिरोज शेख

विमाननगर, मधील दत्त मंदिर शेजारील चौकाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात यावे- फिरोज शेख यांची  मागणी व निवेदन पुणे जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्त यांना दिले…

(खलील प्रमाणे)

महामानवाने आपल्या क्रांतिकारक विचारांनी स्वातंत्र्य, समता, बंधुभाव आणि न्याय ही तत्त्वे समाजमनात रुजविण्याचा प्रयत्न केला. तसेच स्तरातील उपेक्षित, वंचित समूहासाठी आपले आयुष्य पणाला लावले. शेतकरी, कामगार, मजूर, स्त्रिया, दलित, अल्पसंख्याक, समाजामध्ये त्यांनी आपल्या कार्याने क्रांतिकारक बदल घडवून आणले. अशा थोर महामानव, भारतरत्न डॉ बाबासाहेब आबेडकर यांचे नाव प्रभाग क्र. ३ विमाननगर येथील दत्त मंदिराजवळ असणारे स्काय मॅक्स बिल्डिंग समोरील चौकाला महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक असे नाव देण्याची या परिसरातील तमाम जनतेची मागणी आहे. तरी आपणास कळविण्यात येते की, तमाम जनतेची मागणीची दखल घेत आपण लवकरात लवकर दत्तमंदिरा जवळील स्काय मॅक्स बिल्डिंग समोरील चौकाला महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक असे नामकरण करुन येथील नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करावा अशी आपणांस विनंती अर्ज पुणे जिल्हाअधिकारी व पुणे मनपा आयुक्त यांना भारतीय युवा बहुजन संघा कडून निवेदन देण्यात आले आहे. निवेदन देताना संस्थापक अध्यक्ष फिरोज शेख व पदाधिकारी उपस्थित होते.

Related posts

घरभाडे वसुली तीन महिने पुढे…!

Vishal Khandagale

कोरोना: पुणे महानगरपालिका घराजवळ भाजीपाला (तरकारी) उपलब्ध करून देणार !

Vishal Khandagale

पुणे स्टेशन व ताडिवाला रोड “Micro Containment Zone” पहा !

Vishal Khandagale

Leave a Comment