Pune City News
गुन्हे विषयक

आंबेगाव येथे तरुणाचा मृतदेह आढळला पोत्यात

पुण्यातील आंबेगाव खु येथील मुंबई- बंगरुळ महामार्गावर तरुणाचा खून करून मृतदेह पोत्यात टाकून खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. आंबेगाव येथील स्वामी नारायण मंदिरातजवळ सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

भारती विद्यापीठ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ‘मॉर्निंग वॉक’ साठी जाणाऱ्या नागरिकांना स्वामी नारायण मंदिराजवळील सेवा रस्त्याच्या कडेला एका तरुणाचा मृतदेह पोत्यात हात- पाय बांधलेल्या अवस्थेत दिसला.

त्यांनी तत्काळ पोलिसांना ही माहिती कळविण्यात आली. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. खून झालेल्या तरुणाचे अंदाजे वय २५ ते ३० च्या आसपास असून मृत तरुणाला गोधडीमध्ये गुंडाळून त्याचे हात- पाय बांधून पोत्यामध्ये घालून मृतदेह ठेवण्यात आला होता.

तसेच हा मृत तरुण हा अर्धनग्न अवस्थेत आहे. दुसरीकडे खून करुन त्यानंतर त्याचा मृतदेह पोत्यात भरुन येथे टाकण्यात आल्याचा संशय असून अद्याप मृतदेहाची ओळख पटली नसून भारती विद्यापीठ पोलिस पुढील तपास करीत आहेत.

Related posts

खराडी मध्ये युवकाची चाकूने हत्या, दोघे गंभीर जखमी

Vishal Khandagale

पोलिसांनी केला ७ किलो गांजा जप्त !

Vishal Khandagale

दोघांना अटक: 2 काडतुसे, 2 पिस्टल जप्त

Vishal Khandagale

Leave a Comment