गुन्हे विषयकपिपरी चिंचवड

भाजप नगरसेविकेच्या मुलाने पिस्तुलाने स्वत:वर झाडून घेतली गोळी

पिंपरी चिंचवड ;- भाजप नगरसेविकेच्या मुलाने डोक्यात गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चिंचवडे नगर, चिंचवड येथे रविवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास घडली आहे. प्रसन्न शेखर चिंचवडे, असं जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे. प्रसन्ना हा भाजप नगरसेविका करुणा शेखर चिंचवडे यांचा मुलगा आहे.

प्रसन्न याने कुटुंबियांसमवेत रविवारी रात्री जेवण केले. त्यानंतर तो त्याच्या खोलीत गेला. त्यानंतर गोळी झाडल्याचा आवाज आला. त्यामुळे घरातील सदस्यांनी त्याच्या खोलीकडे धाव घेतली असता तो रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं दिसून आलं.

प्रसन्नला थेरगावयेथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तसेच प्रसन्नचे वडील शेखर चिंचवडे यांच्याकडे परवानाधारक पिस्तूल आहे. याच पिस्तुलातून त्याने गोळी झाडून घेतली आहे.

दरम्यान, प्रसन्नने गोळी झाडून का घेतली तसेच त्याने का आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Related posts

कोरोना चाचण्यांची क्षमता वाढवण्यासाठी निधी; अजित पवार

Vishal Khandagale

पीएमपीएमएल’ बसच्या 584 फेऱ्या रद्द!

Vishal Khandagale

पितापुत्रा विरुद्ध गुन्हा दाखल: महिलेच्या पोटावर लाथ मारुन घडवून आणला होता गर्भपात

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.