राज्यातील सर्व मद्यालयांना (लीकर बार) सकाळी आठ ते रात्री दहा या वेळेत व्यवसाय करण्यास मुभा देण्याचा निर्णय पर्यटन विभागाने घेतला.
- त्याचवेळी कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेऊन ही वेळमर्यादा बदलण्याचे स्वातंत्र्य स्थानिक यंत्रणांना देण्यात आले आहे.
- सोमवारपासून हॉटेल, मद्याालयांना व्यवसाय करण्याची मुभा शासनाने दिली. त्यानुसार हॉटेल व्यवसाय सुरू झाला.
- मात्र वेळ मर्यादेबाबत शासन आदेश स्पष्ट नसल्याने मद्याालय चालक मालक संभ्रमात होते.
- आता राज्यातील प्रत्येक शहर, जिल्ह्यांतील मद्याालये रात्री दहापर्यंत व्यवसाय करू शकतील.
- वेळ मर्यादेबाबत संभ्रम दूर झाला असला तरी रात्री दहापर्यंतच्या मुदतीबाबत मद्याालय चालक नाखूष आहेत.

