Pune City News
महाराष्ट्र

…तर सुप्रीम कोर्टाला महाराष्ट्रविरोधी ठरवणार का ? : विरोधी पक्षनेते

PCN

स्थलांतरित मजुरांबाबत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर महाराष्ट्र सरकार सुप्रीम कोर्टाला महाराष्ट्रविरोधी ठरवणार का ? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

फडणवीस म्हणाले :

▪️ स्थलांतरित मजुरांची कुठेही नोंद नसून त्यांची कोणत्याही प्रकारची व्यवस्था झालेली नाही, त्यांना जेवणही मिळाले नाही.

▪️ त्यांच्यासाठी कुठलीही व्यवस्था सरकारने उभी केली नसल्याचे सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरमध्ये आले आहे.

▪️ सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सुप्रीम कोर्टाने इतर कुठल्याही राज्यांवर ताशेरे ओढले नसून फक्त महाराष्ट्रावर ताशेरे आहेत.

दरम्यान, एखादा मुद्दा विरोधी पक्षाने चांगल्यासाठी मांडला तर सरकारने कारवाई केली पाहिजे, तसे न झाल्याने सुप्रीम कोर्टाने चपराक दिली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Related posts

राज्यभरात वीज दरात मोठी कपात

Vishal Khandagale

कर्मचाऱ्यांना घरी बसून काम करण्याचा पर्याय

Vishal Khandagale

अभिनेते जयराम कुलकर्णी काळाच्या पडद्याआड

Vishal Khandagale

Leave a Comment