Pune City News
पुणे

अजित पवार यांना स्वप्न पडत असतील तर आम्ही ही त्यांचे बाप आहोत: चंद्रकांत पाटील

पुणे महापालिकेतील सत्तेबाबत उपमुख्यमंत्री अजित।पवार यांना जर स्वप्न पडत असतील तर आम्हीही त्यांचे बाप आहोत, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.

पुण्यातील कोथरूड परिसरात एका कार्यक्रमात ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी ही टीका केली आहे.

पुणे महानगरपालिकेत शुक्रवारी ( दि.९) रोजी झालेल्या प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांमध्ये १५ पैकी ११ जागांवर भाजपचेच वर्चस्व पाहायला मिळाले.

सोळा प्रभाग समित्यांपैकी ११ प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या जागा भाजपला मिळाल्या असून राष्ट्रवादी काँग्रेसला ३ तर काँग्रेसला १ जागा मिळाली आहे.

यावेळी पाटील यांनी सांगितले की, ‘पुणे महानगरपालिकेच्या झालेल्या प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत १५ पैकी ११ ठिकाणी भाजपाचे सदस्य विजयी झाले.

एक जागा टॉसवर काँग्रेसकडे गेली तर अन्य चार जागी राष्ट्रवादी काँग्रेस विजयी झाला. या प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काहीतरी जादू करून सर्व जागांवर भाजपाचे अध्यक्ष झाले पाहिजे होते.

मात्र, तसे झाले नाही. पण अजित पवार यांना पुढची काही तरी स्वप्नं पडत आहेत, त्यांनी जास्त ऊर्जा वायाला घालवू नये आम्ही देखील अजित पवार यांचे बाप आहोत,’ असे पाटील यांनी सांगितले.

Related posts

बांधकाम व्यवसाय स्वयंस्पुर्तीने कामबंद : क्रेडाई पुणे मेट्रो

Vishal Khandagale

नगरसेवक राहुल भंडारे यांच्या स्वखर्चाने हॅन्ड फ्री सॅनेटायजर मशीनचे वाटप !

Vishal Khandagale

शनिवारवाडा पर्यटकांसाठी खुला

Vishal Khandagale

Leave a Comment