PUNE CITY NEWS :- उत्तर प्रदेश मधील हाथरस येथे दुर्दैवी बलात्कार व हत्याकांड प्रकरणी विमान नगर मधील दत्त मंदिर चौक येथे भावपूर्ण श्रध्दांजली वाहन्यात आली या वेळी काँग्रेस पक्षाचे मा.नगरसेवक मा. राजेंद्र शिरसाट वेळी यांनी या प्रकरणातील दोषींवर फास्ट ट्रॅक कोर्टात लवकरात लवकर खटला चालवून त्यांना फाशी द्या म्हणून तसेच युवती वरती जे अत्याचार केले गेले ते प्रकरण दाबू पाहणाऱ्या तसेच रात्रीतून त्या युवतीच्या मृतदेहाची विटंबना करत विल्हेवाट लावणाऱ्या पोलिस अधिकारी यांच्यावर देखील कारवाईची मागणी केली.

तसेच कार्यक्रमा चे आयोजक पुणे शहर युवक काँग्रेस चे उपाध्यक्ष मा.श्री राहुल शिरसाट म्हणाले, देशात जे मोदी सरकार महिलांच्या सक्षमीकरण सबलीकरणाचे नावावर सत्तेत आले ते तसेच उत्तर प्रदेश मधील योगी सरकार देखील या संपूर्ण प्रकाराला जबाबदार असल्याचे नमूद करत त्यांचा जाहीर निषेध आम्ही सामान्य नागरिकांच्या वतीने करत आहोत

यावेळी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष भुजंग लव्हे, पुणे शहर उपाध्यक्ष,स्वप्निल नाईक ,महासचिव अल्तमश मोमीन, उपाध्यक्ष राजू ठोबरे पुणे शहर युवक काँग्रेसचे सचिव शानु चलवादी ,शिवाजी नगर मतदार संघ अध्यक्ष रोहित बहीरट, पर्वती मतदार संघ अध्यक्ष सुजित लाजुरकर , सतिश चौधरी, किरण पाटोळे,रवी शिंदे, विनोद बनसोडे,दत्ता वाघमारे राहुल लव्हे, प्रदीप म्हस्के, नितिन रोकडे,फिरोज शेख,अक्षय गायकवाड, आकाश माने,मनोज शिरसाट,राजेश बोराडे, दादू लांडगे,रोहन ठोकळ, गौरव खरात,आकाश धोत्रे, अमोल माने इतर कार्यकर्ते व मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते

