Pune City News
राष्ट्रीय

कुणाल कामराला 6 आठवड्यात बाजू मांडण्याचे आदेश

KUNAL KAMRA

प्रसिद्ध कॉमेडीयन कुणाल कामरा यांनी सर्वोच्च न्यायालय संदर्भात केलेल्या वादग्रस्त ट्वीटप्रकरणी आज सुनावणी झाली.

सर्वोच्च न्यायालयनं कॉमेडीयन कुणाल कामरा आणि व्यंगचित्रकार रचिता तनेजा यांना नोटीस पाठवली आहे.

तुमच्यावर अवमानप्रकरणी खटला का चालवू नये, याचं उत्तर 6 आठवड्यात देण्याचे आदेश न्यालयालयाने दिले आहेत.

कुणाल कामरा आणि रचिता तनेजा यांनी स्वत: कोर्टात हजर राहण्याची आवश्यकता नसल्याचं न्यायालयाने सांगितले.

नेमकं प्रकरण काय?

▪️ अर्णब गोस्वामी यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन दिल्यानंतर कुणाल कामरा यांनी न्यायालयाचा तीव्र शब्दात निषेध केला.

▪️ कुणाल कामरा यांनी न्यायालयाने केलेल्या वक्तव्यानंतर देशभरात मोठा वाद सुरु झाला.

▪️ अॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी तातडीने कुणाल कामरा यांच्याविरोधात न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी खटला चालवण्याची परवानगी दिली.

दरम्यान, कुणाल कामरा न्यायालयाच्या अवमानप्रकरणी 6 आठवड्यात काय स्पष्ट करणार आहेत. याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Related posts

चीनची भारताला धमकी!

Vishal Khandagale

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शॅडो कॅबिनेट आज जाहीर

Vishal Khandagale

महापौर चषक कॅरम स्पर्धा

Vishal Khandagale

Leave a Comment