राष्ट्रीय

पाकिस्तानने भारताची ‘ही’ मागणी केली मान्य

भारतीय दुतावासातील अधिकाऱ्यांना कुलभूषण जाधव यांना भेटण्याची परवानगी पाकिस्तानकडून देण्यात आली आहे.

भारतीय दुतावासातील अधिकाऱ्यांना कुठल्याही अटी-शर्थीविना कुलभूषण जाधव यांना भेटू द्यावे, अशी मागणी भारताने केली होती.

इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्त कार्यालयाला भेटीसाठी चार वाजताची वेळ देण्यात आली आहे.

दोन अधिकाऱ्यांना कुलभूषण जाधव यांची भेट घेण्याची परवानगी द्यावी, ही मागणी सुद्धा पाकिस्तानने मान्य केली आहे.

इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये 20 जुलै फेरविचार याचिका दाखल करण्याची अंतिम तारीख आहे. त्याआधी ही परवानगी द्यावी असे भारताने म्हटले होते.

कुठल्याही अर्टी-शर्थीविना भेटण्याच्या परवानगीशिवाय पाकिस्तानने चर्चेसाठी इंग्रजी भाषेची सक्ती करु नये, अशी मागणी सुद्धा भारताने केली आहे.

मागच्या आठवड्यात कुलभूषण जाधव यांनी पुनर्विचार याचिका दाखल करण्यास नकार दिल्याची माहिती पाकिस्तानकडून देण्यात आली होती.

भारतानं याप्रकरणी प्रतिक्रिया देत पाकिस्ताननं कुलभूषण जाधव यांच्यावर दबाव आणत तो निर्णय घेण्यास भाग पाडल्याचा आरोप केला होता.

Related posts

भारतीय सैन्याने नौशेरा सेक्टरमध्ये घुसखोरी करत 3 दहशतवाद्यांचा खात्मा केला, शोधमोहीम सुरूच आहे

Vishal Khandagale

कोरोना; राज्यातील सर्व निवडणुकांना स्थगिती

Vishal Khandagale

कोरोना च्या पाश्वभूमी मुंबईत “जमाव बंदी” चे आदेश

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX