पुणेराष्ट्रीय

डॉ. हर्षवर्धन होणार WHO च्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष

Pune City News:- केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.हर्षवर्धन हे 22 मे रोजी जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारतील. डॉ. हर्षवर्धन हे कोरोना विरुद्ध भारतातील युद्धाच्या अग्रगण्य लोकांपैकी एक आहेत.

डॉ. हर्षवर्धन यांची नियुक्ती जपानचे डॉ. हिरोकी नाकातानी यांच्या जागी होत असून नाकातानी हे डब्ल्यूएचओच्या 34 सदस्यीय मंडळाचे विद्यमान अध्यक्ष आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेच्या बैठकीत भारतातर्फे डॉ. हर्षवर्धन यांची नियुक्ती करण्याच्या प्रस्तावावर मंगळवारी 194 देशांनी सह्या केल्या. त्यानंतर, डॉ. हर्षवर्धन हे पद ग्रहण करणे ही फक्त औपचारिकता शिल्लक होती.

मे पासून सुरू होणार्‍या 3 वर्षाच्या कार्यकाळात भारत कार्यकारी मंडळावर राहील, असेही यावेळी सर्वानुमते ठरले. 22 मे ला कार्यकारी मंडळाच्या बैठकीत डॉ. हर्षवर्धन यांची निवड केली जाईल असे जागतिक आरोग्य संघटनेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

प्रादेशिक गटांमधील अध्यक्ष पद एक वर्षासाठी रोटेशन तत्त्वावर दिले जाते. दरम्यान, शुक्रवारी (22 मे) सुरू होत असलेल्या पहिल्या वर्षासाठी भारताचे उमेदवार कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष असतील असा निर्णय गेल्या वर्षीच घेण्यात आला होता.

डॉ. हर्षवर्धन यांना दिलेली ही जबाबदारी पूर्णवेळ नाही आणि आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांना फक्त कार्यकारी मंडळाच्या बैठकीचे अध्यक्षपद भूषवावे लागणार आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

Related posts

नवीन सरकारी योजनांवर ब्रेक…

Vishal Khandagale

मनसेच्या वतिने ‘मी मराठी- माझी स्वाक्षरी मराठी’ उपक्रम

Vishal Khandagale

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारविश्व सर्वांसाठी मार्गदर्शक – कुलगुरु

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX