पुणे

राज्यस्तरीय पर्यावरण शॉर्टफिल्म फेस्टीव्हलचे आयोजन

माय अर्थ फाउंडेशन आणि सहयोगी संस्थांच्या मार्फत जागतिक युवा दिना निमित्त माझी वसुंधरा अभियानांतर्गत राज्यस्तरीय पर्यावरण शॉर्टफिल्म फेस्टिव्हलचे पुण्यात आयोजन करण्यात आले आहे.

स्वच्छता, जैवविविधता, कचरा विलगीकरण, अर्बन फॉरेस्ट, नदी पुनरुज्जीवन अशा विविध विषयांवरील लघुपटांचा या महोत्सवात समावेश असेल. ११आणि १२ जानेवारी रोजी पुण्यातील स्व. बाळासाहेब ठाकरे कलादालन, सारसबागजवळ पुणे येथे आयोजित करण्यात आला असल्याची माहिती माय अर्थ फाउंडेशनचे अध्यक्ष अनंत घरत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

हे फेस्टिवल माय अर्थ फौंडेशन,सस्टेनाबिलीटी इनिशीएटीव्हज, एन्व्हार्मेंट क्ल्वब ऑफ इंडीया व ध्यास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केले आहे. यावेळी एन्व्हार्मेंट क्ल्वब ऑफ इंडीयाचे ललित राठी, सस्टेनेबल इनिशिएटिव्हचे अमोल उंबरजे, ध्यास प्रतिष्ठानचे सोमनाथ पाटील यावेळी पत्रकार परिषदेत उपस्थित होते.

अनंत घरत म्हणाले की, हवामानातील बदलामुळे अनियमीत पाऊस, निसर्गसारखी वादळे अशी संकटे निर्माण झालेली आहेत. त्यामुळे पर्यावरण रक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही. म्हणूनच सर्वांच्या एकत्रित सहभागातून माझी वसुंधरा अभियान प्रभावीपणे राबवण्याचे आवाहन राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले होते.

या आवाहनाला प्रतिसाद म्हणून या अभियानाला प्रबोधनात्मक जनजागृतीसाठी पर्यावरण विषयावरिल लघूपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

राज्यस्तरीय पुणे पर्यावरण शॉर्टफिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी 5 जानेवारीपर्यंत myearththree@gmail.com यावर मेल करावा किंवा 9561792055 यावर संपर्क साधण्याचे आवाहन सोमनाथ पाटील यांनी केले.

Related posts

“पुणे बंद व मूक मोर्चा” वाहतुकीत बदल !

Vishal Khandagale

मुलीच्या वाढदिवशी गरजूना जीवनाश्यक वस्तूचे केले वाटप : यशवंतराव मानखेडकर

Vishal Khandagale

पिंपरी चिंचवड शहराचा केंद्राच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात राज्यात सातवा क्रमांक

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.