पुणे

पिंपरी चिंचवड शहराचा केंद्राच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात राज्यात सातवा क्रमांक

PUNE CITY NEWS :- केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत सर्वेक्षण २०२० या स्पर्धेत पिंपरी चिंचवड शहराने स्वच्छतेनध्ये देशात २४ वा क्रमांक मिळवला आहे. तर राज्यात शहराने सातव्या क्रमांकावर बाजी मारली आहे.

केंद्राच्या सर्वेक्षणाचा आज गुरुवारी (दि.२०) निकाल जाहीर झाला आहे. या निकालाबाबत मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांनी माहिती दिली.

२०१६ मध्ये झालेल्या अभियानामध्ये स्वच्छ पिंपरी चिंचवड शहर हे पहिल्या १० क्रमांकामध्ये होते. तर केंद्रात शहराचा ९ वा क्रमांक होता.

महाराष्ट्र राज्यातून पहिला क्रमांक मिळवला होता. २०१७ च्या झालेल्या सर्वेक्षणात पिंपरी चिंचवड शहर हे स्वच्छतेच्या बाबतीत मागे पडले होते.

त्यामुळे पिंपरी चिंचवड शहराने ७२व्या क्रमांकावर गेले होते. त्यानंतर २०१८ मध्ये झालेल्या स्पर्धेत शहराने ४३वा क्रमांक पटकावला.

तर राज्यात त्यावेळी ६ वा क्रमांक आला होता. २०१९ मध्ये स्वच्छ सर्वेक्षणात पिंपरी चिंचवड शहराचा देशात ५२ वा तर राज्यात १३ वा क्रमांक आला होता.

मात्र यंदाच्या वर्षी म्हणजे २०२० मध्ये स्वच्छ सर्वेक्षणात शहराने चांगली बाजी मारली असून पिंपरी चिंचवड शहराचा स्वच्छतेच्या बाबतीत जगात २४ व क्रमांक मिळवला असून देशात सातवा क्रमांक पटकावला आहे.

Related posts

वडापावच्या गाडीवरून काळेवाडी येथे तरुणाचा खून

Vishal Khandagale

कोरोनातून बरे झालेल्या व्यक्तींनी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे; डॉ. म्हैसेकर

Vishal Khandagale

८ महिन्यांनंतर रंगभूमी झाली “अनलॉक

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX