Pune City News
राष्ट्रीय

व्हॉट्सअ‍ॅपला पत्राद्वारे केंद्र सरकारची मागणी

प्रायव्हसी पॉलिसीतील बदल मागे घेण्यासाठी केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने व्हॉट्सअ‍ॅपचे मुख्य कार्यकारी अधिकारी विल कॅथकार्ट यांना पत्र लिहिलं आहे.

व्हॉट्सअ‍ॅपचे सर्वाधिक वापरकर्ते भारतात असून व्हॉट्सअ‍ॅप सुविधेसाठी भारत मोठी बाजारपेठ असल्याचे पत्रात नमूद केले.

व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्या धोरणामुळे गोपनीयता धोका होईल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

याबद्दल व्हॉट्सअ‍ॅपने स्पष्टीकरण दिल्यानंतरही लोकांच्या मनातील संभ्रम कायम आहे.

नव्या धोरणाला मान्यता देण्यासाठीची मुदत व्हॉट्सअ‍ॅपने वाढवली आहे. ही मुदत ८ फेब्रुवारीला संपणार आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने थेट व्हॉट्सअ‍ॅपच्या सीईओंना पत्र लिहून नवे बदल मागे घेण्याची मागणी केली आहे.

Related posts

देशात 100% जनता कर्फ्यु !

Vishal Khandagale

किराणा दुकान ONLINE ; शॉपमॅटिकचा पुढाकार

Vishal Khandagale

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उद्या सकाळी 9 वाजता ‘स्पेशल मेसेज’

Vishal Khandagale

Leave a Comment