Pune City News
पुणे

मुठा, रिहे खोर्‍यातील ग्रामस्थांसाठी नवीन पीएम पीएमएल बससेवा

मुळशी तालुक्यातील मुठा खोऱ्यातील ग्रामस्थांसाठी गेल्या अनेक वर्षांपासूनची बस सेवेची प्रतीक्षा आता संपली आहे. म्हसोबा देवस्थान खारवडे यांची ही मागणी होती की पीएमपीएमएलची बससेवा खारवडे पर्यंत सुरू करण्यात यावी.

ही मागणी पूर्ण करून नविन बसमार्ग मार्केटयार्ड ते खारावडे सुरू करण्यात आला. तसेच रिहे खोर्‍यातील पूर्वीची डेक्कन ते खांबोली या बसमार्गाचा विस्तार करुन मार्केटयार्ड ते कातरखडकपर्यंत करण्यात आला आहे.

यामुळे रिहे, वळणे, कातरखडक ग्रामस्थांना फायदा होणार आहे. या बस सेवेचा शुभारंभ महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी पीएमपीएमएल संचालक शंकर पवार, श्रीनाथ भिमाले, नगरसेवक प्रविण चोरबेले, राजाभाऊ बराटे,शिवराम मेंगडे , नगरसेविका कविता वैरागे, राजश्री शिळीमकर, अनुसया चव्हाण हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते.

Related posts

बारामती पोलिसांची धडक कारवाई, ४७ लाखांचा गांजा जप्त

Vishal Khandagale

जुलै अखेर 18 हजार कोरोनाचे रुग्ण असतील : महापालिका आयुक्त

Vishal Khandagale

उपाययोजनेसाठीची माहिती दररोज अद्यावत करा : विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर

Vishal Khandagale

Leave a Comment