Pune City News
पुणे

अंगारकी चतुर्थीला दगडूशेठ गणपती मंदिर दर्शनासाठी बंद

▪️ कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, अंगारकी चतुर्थी  येत्या  मंगळवारी ( दि.२ ) मार्च रोजी श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिर दर्शननासाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

▪️ हा निर्णय दगडूशेठ गणपती ट्रस्टने घेतला आहे, अशी माहिती ट्रस्टकडून देण्यात आली आहे.

▪️ अंगारकी चतुर्थीला शहर व उपनगरांतून दरवर्षी मोठ्या लाखोंच्या संख्यने भाविक येतात.

▪️ त्यामुळे गर्दी होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून मंगळवारी मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे चतुर्थीच्या दिवशी भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही.

▪️ अंगारकीच्या दिवसासह इतरही दिवशी भक्तांकरीता अभिषेक व्यवस्था व इतर पूजा ऑनलाईन पद्धतीने करण्यात आली आहे.

▪️ भक्तांनी ऑनलाईन पद्धतीने नाव नोंदणी केल्यास त्यांच्यावतीने गुरुजींद्वारे धार्मिक विधी होऊ शकतील. त्याकरीता https://seva.dagdushethganpati.com/fasttrack यावर नोंदणी करावी.असे आवाहन करण्यात आले आहे.

Related posts

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार !

Vishal Khandagale

कोरोना च्या पाश्वभूमी मुंबईत “जमाव बंदी” चे आदेश

Vishal Khandagale

अखिल भारतीय अग्रवाल परिषदेच्या अग्रोदय महाअधिवेशनात लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांची उपस्थिती

Vishal Khandagale

Leave a Comment