Pune City News
मनोरंजनराष्ट्रीय

राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा, कंगना ठरली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

‘राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार-2020’ सोहळा राजधानी दिल्लीतील विज्ञान भवनात सोमवारी जल्लोषात पार पडला.

या सोहळ्यात अभिनेत्री कंगना रणौतला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे. ‘पंगा’ आणि ‘मणिकर्णिका’ या चित्रपटात तिने केलेल्या अभिनयासाठी तिला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

तसेच अभिनेता मनोज वाजपेयी यांना ‘भोंसले’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. तर ‘बोर्डो’ हा चित्रपट सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला आहे. तसेच सुशांत सिंगच्या ‘छिछोरे’ चित्रपटाला सर्वश्रेष्ठ हिंदी चित्रपट पुरस्कार मिळाला आहे.

दरम्यान, कंगनाचे चाहते सध्या प्रचंड खुश असून सोशल मीडियाद्वारे त्यांनी कंगनावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.


राष्ट्रीय पुरस्कारांची नुकतीच घोषणा झाली असून राष्ट्रीय पुरस्काराची संपूर्ण यादी पुढीलप्रमाणे-
सर्वोत्कृष्ट चित्रपट
मर्कर लॉयन ऑफ द अरेबियन सी
सर्वोत्कृष्ट एडिटिंग
जर्से (तेलुगू)
सर्वोत्कृष्ट  गायिका
सावनी रविंद्र – बार्डो
सर्वोत्कृष्ट गायक
बी प्राक
सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्री
पल्लवी जोशी
सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेता
विजय सेतुपथी
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
कंगना रणौत (मनिकर्णिका, पंगा)
सर्वोत्कृष्ट अभिनेता
मनोज वाजपेयी (भोसले)
धनुष (तमीळ)
सर्वोत्कृष्ट स्पेशल मेन्शन
बिरयानी (मल्याळम)
जौनकी पोरा (आसामी)
लता भगवान करे (मराठी)
पिकासू (मराठी)
सर्वोत्कृष्ट मराठी फिल्म
बार्डो
सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट
छिछोरे
सामाजिक प्रश्नांवरील सर्वोत्कृष्ट चित्रपट
आनंदी गोपाळ
राष्ट्रीय इंटर्गेशनवरील सर्वोत्कृष्ट चित्रपट
ताजमहाल

Related posts

ज्येष्ठ अभिनेत्री आशालता यांचा कोरोनामुळे मृत्यू

Vishal Khandagale

ठाकरे सरकार कोरोना रोखण्यास अपयशी : सुब्रमण्यम स्वामीं

Vishal Khandagale

कोवीड रुग्णांसाठी रेमडेसिवीर इंजेक्शनचा योग्य वापर करावा

Vishal Khandagale

Leave a Comment