राष्ट्रीय

पेट्रोलच्या – डिझेलच्या उत्पादन शुल्कात वाढ

Pune City News:- केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात मोठी वाढ केली आहे. पेट्रोलच्या उत्पादन शुल्कात प्रति लिटर 18 रुपयांची तर डिझेलवरील उत्पादन शुल्कात 12 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
मोदी सरकारने मार्च महिन्यात दुसऱ्यांदा इंधनाच्या उत्पादन शुल्कात वाढ केली आहे. त्यामुळे इंधनाचा भडका उडणार आहे. इंधनाची किंमत वाढल्याने याचा भार सर्व सामान्यांच्या खिशावर पडणार आहे.
सरकारने एक्साईज ड्यूटीत कोणतीही वाढ न केल्यास पेट्रोल डिझेलच्या किमती जवळपास 10 ते 12 रुपये प्रति लिटर कमी होऊ शकते, मात्र आता सरकारने एक्साईज ड्यूटी वाढवल्याने इंधन दर कमी होण्याची शक्यता धूसर झाली आहे. आधीच कोलमडलेल्या आर्थिक स्थितीत कोरोना व्हायरसच्या संसर्गाने थैमान घातलं आहे. त्यामुळेच आर्थिक तूट भरुन काढण्यासाठी सरकारने ही वाढ केल्याचं बोललं जात आहे.

Related posts

कोरोना ग्रस्थ ! मृतांच्या कुटुंबीयांना 4 लाख रुपयांची मदत!

Vishal Khandagale

…अशी भाषा शत्रूच्या देशातही वापरत नाही : शाहनवाज हुसैन

Vishal Khandagale

एअर इंडियाच्या वैमानिकास कोरोना !

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX