Pune City News
राष्ट्रीय

देशाच्या संसदेत मिळणार ‘ही’ संधी!

सरकारी नोकरी अनेकांचे स्वप्न असते. म्हणूनच इंटर्नशीपची संधी अशा तरुणांना फायद्याची ठरणार आहे. या इंटर्नशीपनिमित्त चक्क देशाची संसद पाहण्याची संधी आहे. संसदेत इंटर्नशीपसाठी अर्ज मागवले आहेत.या इंटर्नशीपमध्ये तुम्हाला देशाच्या संसदेचं कामकाज पाहण्याची आणि तेथे काम करण्याची संधी मिळणार आहे. केंद्र सरकारने राज्यसभेत इंटर्नशीप प्रोग्राम सुरू केला आहे. त्याअंतर्गत अर्ज मागवण्यात आले आहेत.
इंटर्नशीपसाठी उमेदवारांकडून कुठली विशिष्ट अर्हता गरजेची नाही. आपण भारतात पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेत असल्यास आपणास ही इंटर्नशीप करत येईल.
असा करा अर्ज : राज्यसभा इंटर्नशीप 2020 साठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 मार्च 2020 आहे. अर्ज ऑफलाइन करायचा आहे. यासाठीचा अर्ज राज्यसभेच्या संकेतस्थळावरून डाउनलोड करता येणार आहे.
*पत्ता* : एसडी नॉटियाल, जॉइंट सेक्रेटरी, राज्यसभा सेक्रेटरिएट, रुम नं. 517, पाचवा मजला, पार्लियामेंट हाऊस एनेक्स, नवी 110001
*Email* : rssei.rsrs@sansad.nic.in
ही इंटर्नशीप उन्हाळ्याच्या सुट्टीत होणार असून दोन महिन्यांच्या कालावधीत ही इंटर्नशीप होणार आहे. उमेदवारांना प्रति महिना 10 हजार रुपये स्टायपेंड मिळणार आहे. इंटर्नशीप पूर्ण झाल्यावर सरकारकडून सर्टिफिकेटदेखील मिळणार आहे.

Related posts

काँग्रेस नेते डी.के. शिवकुमार यांच्या मुंबई, दिल्लीसह १४ मालमत्तांवर सीबीआयच्या धाडी

Vishal Khandagale

कोरोना : तीन महिने ईएमआय ची स्थगिती चा सल्ला!

Vishal Khandagale

व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्या पॉलिसीला उच्च न्यायालयात आव्हान !

Vishal Khandagale

Leave a Comment