कसबाकोथरूडखडकवासलापर्वतीपुणे कॅंटोन्मेंटपुणे शहरवडगावशेरीशिवाजीनगरहडपसर

पुणे शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने उद्यापासून राहणार बंद !

राज्य सरकारच्या निर्देशानुसार उद्यापासून पुणे महानगरपालिका हद्दीतील अत्यावश्यक सेवा वगळून सर्व दुकाने ३० एप्रिल २०२१  पर्यंत बंद असणार आहेत.

तसेच राज्य सरकारच्या विकेंड लॉकडाऊनची अंमलबजावणीही शहरात काटेकोरपणे केली जाणार आहे, असं ट्विट पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केलं आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात विकेंड लॉकडाऊन तसेच रात्री ८  ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

त्याआधीच पुण्यात संध्याकाळी ६  वाजल्यापासून संचारबंदी सुरु करण्यात आली होती. महाराष्ट्रात निर्बंध लागल्यानंतर पुण्यातील निर्बंध जसेच्या तसे ठेवण्यात आले होते.

दरम्यान, जीवनावश्यक सेवा वगळून पुण्यातील सर्व दुकाने ३०  एप्रिलपर्यंत बंद राहणार आहेत. व्यापाऱ्यांनी सरकारच्या या निर्णयाला विरोध केला होता.

मात्र मुरलीधर मोहोळ यांनी अत्यावश्यक सेवा वगळून सर्व दुकानं उद्यापासून बंद राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

Related posts

1 मे नंतर देखील लसीसाठी ज्येष्ठ नागरिकांनाच प्राधान्य : महापौर मोहोळ

Vishal Khandagale

खेड शिवापूर टोल नाक्यावर चाकरमानी व पर्यटक बेहाल !

Vishal Khandagale

पुणे शहरात होळी व धूलिवंदनविषयी मोठा निर्णय!

Vishal Khandagale
Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX